Top news महाराष्ट्र मुंबई

कचरावेचक भावांच्या ‘या’ कलेवर आनंद महिंद्रा फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Photo Credit- Twitter/@anandmahindra

मुंबई |  प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते सुप्तगुण असतात. कला ही व्यक्तीची परिस्थिती, रुप पाहून येत नाही. तर ती त्याच्या अंगी आधीपासून असते. असंच सध्या सोशल मिडीयावर दोन कचरा वेचणाऱ्या भावांचे व्हिडीओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

दोन भाऊ कचरा वेचत मधूर आवाजात गाणं म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ मोबाईल मधून शूट करुन उद्योगपती आणि महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच त्या दोघांना संगीत शिक्षणाची माहिती देण्यासाठी लोकांनी मदत करावी, असं आवाहनही आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवरुन केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा सायकलीवरुन कचरा गोळा करत असल्याचे दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये तो ‘ये जाने तेरा गोरा बदन’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. हे गाणं ‘अनमोल मोती’ या चित्रपटातलं आहे. हा चित्रपट सन 1969 साली प्रदर्शित झाला होता.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये दुसरा मुलगा ‘सजदा’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. हे गाणं ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील आहे आणि हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. तसेच तो देखील सायकलवरुन कचरा गोळा करत असल्याचे व्हिडीओमधून समजत आहे.

दोघांची परिस्थीती बिकट असल्याचे व्हिडीओमधून समजत आहे. त्या दोघांचे हातावर आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण होत आहे.

व्हिडीओमधील गाणं म्हणणाऱ्या दोन मुलांची नाव हफीज आणि हबीबूर आहे. व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणाले कि, हा व्हिडीओ रोहित खट्टरने पोस्ट केला आहे. हे दोन कचरा गोळा करणारे भाऊ आहेत.

ते दोन भाऊ दिल्लीतील एका कॉलीनीमधील कचरा गोळा करतात. मात्र त्यांची जी गाण्याची कला आहे त्याला तोड नाही. प्रतिभा कुठे व कशी जन्म घेईल ते सांगता येत नाही.

या दोघांना संगिताचं शिक्षण मिळाव यासाठी त्यांना मदत करण्याचा निश्चय मी आणि माझा मित्र रोहितने केला आहे. दोन्ही भाऊ दिवसभर कामात असतात. त्यामुळे त्यांना संध्याकाळी संगीत शिकवू शकेल असा शिक्षक मिळू शकेल का?, असंही आनंद महिंद्रा यांनी विचारलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! खासदार डेलकरांच्या सु.साईड नोटमध्ये आढळलं ‘या’ दिग्गज नेत्यांचं नाव

संजय राठोडांचा पाय आणखी खोलात! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन मेसेज व्हायरल

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील भाजपच्या ‘या’ नेत्यासह तिघांवर गु.न्हा दाखल

मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला अन् मृ.त व्यक्ती भर चाैकात चहा पिताना दिसला!

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक