काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष स्वप्नात जगत आहेत- आनंदराज आंबेडकर

औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष मुस्लिम आणि दलित समाज आपल्यासोबत असल्याच्या स्वप्नामध्ये जगत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाचं काँग्रेसला गांभीर्य नाही, असंं रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज्यातील दलित आणि मुस्लिम समाज काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याचा या दोन्ही पक्षांचा भ्रम आहे. या दोन्ही पक्षातील नेते पक्ष सोडून जात आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ उमेदवारी देण्यासाठी माणसे शिल्लक राहिलेली नाहीत, असा टोलाही आनंदराज आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे.

काँग्रेसला वंचितने 144 जागांची मागणी केली होती. वंचित आपल्या कोठ्यातून मित्रपक्षांना उमेदवारी देणार असल्याचं ठरलं होतं. मात्र काँग्रेस वंचितसोबत आघाडी करण्याबाबत गांभीर्य घेत नसल्याचं दिसतंय, असंही ते म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी राजकारणाला काधीच महत्व दिलं नाही. तर दलित समाज कसा सशक्त करता येईल याकडे लक्ष दिलं आहे, असं आनंदराज आंबेडकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन सेनेने वंचित आघाडीकडे 15 जागांची मागणी केली असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-