अॅंकरने हिंदी भाषेचा वापर केला म्हणून ‘या’ प्रसिद्ध संगीतकारने अँकरला केलं ट्रोल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मिडीयावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हे कलाकारांचे देखील असतात. कलाकार डान्सचे, गाण्याचे असे अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असतात. त्या व्हिडीओमुळे त्यांना अनेकवेळा नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात.

मात्र एका प्रसिद्ध संगितकारने एका अँकरला ट्रोल केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा संगितकार दुसरा-तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध बॉलिवूड संगितकार ए. आर. रेहमान आहे.

ए. आर. रेहमान यांनी एका कार्यक्रमामध्ये हिंदी बोलणाऱ्या अँकरला ट्रोल केलं. त्यांच्या या अनोख्या ट्रोलिंगचा व्हिडीओ सोशल मीडीयावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

99 चित्रपटातील गाण्यामुळे ए. आर. रेहमान सध्या चर्चेत आहेत. हा चित्रपट तमिळ आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी स्व:ता ए. आर. रेहमान यांनी स्विकारली आहे. असंच एका ठिकाणी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते चित्रपटातील कलाकारांसोबत गेले होते.

त्यावेळी प्रमोशनाच्या कार्यक्रमावेळी स्टेजवरील अँकरनं अभिनेता एहान भट याचं हिंदू भाषेत स्वागत केलं. त्या अँकरचं हिंदी ऐकूण ए. आर. रेहमान आश्चर्य चकीत झाले. त्यानंतर ए. आर. रेहमान यांनी त्या अँकरला तू हिंदीमध्ये बोलतेस का?, असा सवाल केला. हा प्रश्न त्यांनी तिला गंमतीत विचारला होता.

त्यांच्या या प्रश्नानंतर त्या अँकरनं त्यांना उत्तर दिलं की, मी केवळ एहान भट यांचं स्वागत करत होते, अशी तिने हसत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सर्व प्रेक्षक आणि कालाकार हसू लागले. अर्थात हा संवाद केवळ गंमत म्हणून सुरु होता. या प्रसंगाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, दिक्षिण भारतात हिंदी भाषेचा वापर खूप कमी प्रमाण केला जातो. एवढच नाहीतर चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही कलाकार हिंदी, इंग्रजीमध्ये न बोलता त्यांच्या मातृभाषेचा वापर करतात. त्यामुळे एका तमिळ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अँकर हिंदीत बोलत असल्यामुळे ए. आर. रेहमान यांना आश्चर्य वाटलं असावं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surya (@suryasurya5073)


महत्वाच्या बातम्या-

“आठवड्याच्या शेवटी लावलं जाणार लॉकडाऊन आणि नाईट…

काय सांगता! तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे चांदी;…

मोठी बातमी! पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लागू होणार?…

‘या’ देशात सोन्याचा डोंगर सापडला अन् सोनं…

हा पोपट चक्क कुत्र्याच्या प्रेमात वेडा झालाय! पाहा प्रपोज…