मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करुन जातात. तर काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देऊन जातात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्राण्यांचे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये बोलणारा कोंबडा असेल किंवा कॅट वॉक करणारी गाई असेल. हे व्हिडीओ आपलं चांगलंच मनोरंजन करून जातात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक रानम्हैस आणि सिंहाच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाची चांगलीच फजिती झाल्याचं दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका रानम्हैशीने सिंहाला उचलून आदळलयाचं दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक सिंह रानम्हैशीची शिकार करण्याच्या विचारात असतो. तो म्हैशीवर हल्ला करतो आणि तिचे पाठीमागचे पाय आपल्या तोंडात पकडून तिला खाली पाडतो. तितक्यात जंगलातील इतर रानम्हैशिंच्या हे सर्व लक्षात येतं.
रानम्हैशींच्या कळपातील एक म्हैस त्या सिंहाच्या अंगावर धावून जाते आणि आपल्या शिंगांने त्या सिंहाला उचलून आदळते. ही म्हैस सिंहाला दोन वेळा उचलून आदळते. यानंतर या सिंहाला पळता भुई थोडी होते.
केवळ पाच सेकंदात या म्हैशीने सिंहाला चितपट केल्याचं दिसत आहे. ज्या म्हैशीवर सिंहाने ह.ल्ला केलेला असतो ती म्हैस उठण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्या म्हैशीला जागेवरून उठता येत नाही, असं देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.
‘द डार्क साईड्स ऑफ नेचर’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर मजेशीर कॅप्शन देखील देण्यात आला आहे. म्हैस विचारते छापा की काटा, असं कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आला आहे.
दरम्यान, 8 मार्च रोजी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ अपलोड झाल्यापासून सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
तसेच 1 हजारापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये जंगलाच्या राजाची चांगलीच फजिती झालेली दिसत असल्याने नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
Buffalo asks- “Heads or Tails”.. pic.twitter.com/AhCFabi6QB
— The Dark side of nature (@Darksidesnature) April 8, 2021
महत्वाच्या बातम्या –
काय सांगता! ‘हा’ कावळा चक्क बोलतो, पाहा तर मग नेमकं काय म्हणतोय गजब कावळा?
अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं घेतलं स्वतःला मारुन, पाहा व्हायरल व्हिडीओ
वाह रे मजणू! प्रियकर तब्बल 12 तास पाण्याच्या टाकीवर चढून…
जगन्नाथाच्या ‘या’ मंदिराचं कोडं आजवर वैज्ञानिकांना देखील उलगडलं नाही; वाचा सविस्तर
धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल