वृत्तवाहिनीच्या लाईव्ह चर्चेत ‘या’ भाजप नेत्याला चपलेनं मा.रलं! पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. काहीवेळा तर हे नेते एकमेकांना टार्गेट करण्यासाठी खालच्या पातळीवर जावून टिका करतात.

अनेक वृत्त वाहिन्यांवर रोजच राजकीय विषयांवर चर्चा होतात. या कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या विरोधातील नेते उपस्थित असतात. यावेळी प्रत्येकजण आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. वृत्त वाहिन्यांवरील या चर्चांमदरम्यान अनेकदा एकमेकांना अपशब्द वापरले गेले आहेत. एकमेकांवर धावून जाण्याच्या घटणा देखील अनेकदा घडल्या आहेत.

अशातच आता एका तेलगू वृत्त वाहिनीवर याच्याही पुढचा प्रकार घडला आहे. एका लाईव्ह चर्चेदरम्यान भाजप नेत्याला चपलेने मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकंच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी एका तेलगू वृत्तवाहिनीवर लाईव्ह चर्चा चालू होती. या चर्चेला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या चर्चेला आंध्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस एस विष्णू वर्धन रेड्डी, अमरावती परिक्षणा समिती संयुक्त कृती समितीचे सदस्य कोलिकापुडी श्रीनिवास राव हे देखील उपस्थित होते.

यावेळी एस विष्णू वर्धन रेड्डी आणि श्रीनिवास राव यांच्यात चांगलाच वाद पे.टला. राव यांचा तेलगू देसम पक्षाशी संबंध असल्याचा आरोप रेड्डी यानी केला. यानंतर राव चांगलेच भडकले. त्यांनी सरळ पायातील चप्पल काढली आणि रेड्डी यांच्याकडे ही चप्पल भिरकवली.

राव यांनी मारलेली ही चप्पल रेड्डी यांच्या तोंडाला लागली. भाजपचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू विराज यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करत निषेध नोंदविला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

तसेच आंध्र प्रदेश मधील इतरही काही महत्वाच्या नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत हे घाणेरडे राजकारण असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

1 मार्चपासून शाळा बंद? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाजपमध्ये प्रवेश

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय – देवेंद्र फडणवीस

‘शिव्या खायला तयार राहावं लागणार’, ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy