भर मैदानात टीम इंडियाचा ड्रामा! थर्ड अंपायरच्या निर्णयावर कोहली स्टम्प माइकमध्ये म्हणाला…

केपटाऊन | सध्या भारत आणि दक्षिण अफ्रिका (India VS SA) यांच्यात कसोटी सामना (Test Match) खेळवला जात आहे. केपटाऊनच्या मैदानावर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे.

तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ बरोबरीवर आहेत. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आता उद्याचा दिवस दोन्ही संघासाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेला सामना आता रंगतदार स्थितीत पोहचला आहे. अशातच आता आजच्या दिवशी मैदानात एक अजब प्रकार पहायला मिळाला. भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

लक्ष लवकर पार करता यावं यासाठी अफ्रिकेच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. कप्तान डीन एल्गर आणि कीगन पीटरसन या दोघांनी 50 धावांची भागेदारी केली.

डीन एल्गर भारतीय गोलांदाजांचा समाचार घेत असताना आर आश्विनच्या एका षटकात पायचीत झाला. त्यावेळी मैदानावरील अंपायरने एल्गरला बाद दिले. परंतु दक्षिण अफ्रिकेने रिव्हूव घेतल्यानंतर एग्लरला थर्ड अंम्पायरने नाबाद दिलं.

त्यानंतर कोहली आणि आश्विनला राग अनावर झाला. त्यावेळी त्याने माईक जवळ जाऊन “फक्त विरोधी नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा. सर्वांच्या चुका पकडण्याचा प्रयत्न करा”, असं इंग्रजीमध्ये म्हटलं.

तर दुसरीकडे “तुम्हाला सुपरस्पोर्ट जिंकण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधले पाहिजेत”, असं आश्विन दुसऱ्या माईकमध्ये जाऊन म्हणाला. या दोघांची कृतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

तर दुसरीकडे के एल राहुल देखील संपूर्ण देश अकरा खेळाडूंविरुद्ध खेळत असल्याचं माईकमधून ऐकायला येत आहे. त्यामुळे आता टीम इंडियावर कडाडून टीका देखील होताना दिसत आहे.

दरम्यान, केपटाऊन कसोटी जिंकून 29 वर्षांपासूनचा मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या –

“इंदुरीकरांवर कारवाई करा अन्यथा…”; तृप्ती देसाई पुन्हा आक्रमक

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…