‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ
मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युपासून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत चर्चेत आहे. अंकिताने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत सुशांतच्या मृ.त्यूचे दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने गेल्या काही दिवसांमध्ये सुशांतविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
तसेच तिने काही वैयक्तिक फोटोज आणि काैटुंबिक कार्यक्रमाचे फोटोज देखील सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. मात्र, यावरुन सुशांतच्या चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रो.ल केलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुशांतचे चाहते तिला ट्रो.ल करत आहेत. मात्र, आता अंकिता ट्रो.लर्सवर वैतागली आहे.
अंकिताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत ट्रो.लर्सला सणसणीत उत्तर दिलं आहे. अंकिता सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन लाईव्ह आली. यावेळी अंकिताने ट्रो.लर्सला चांगलंच खडसावलं आहे.
यावेळी अंकिता म्हणाली की, जे लोक आत्ता माझ्याकडे बोट दाखवत आहेत. त्यांना माझ्या रिलेशनबाबत काहीही माहित आहे. आमच्या आयुष्यात जेव्हा सर्वकाही संपत होतं त्यावेळी तुम्ही कोठे होता. आज तुम्ही सर्वजण मला दो.ष देत आहात. पण यात माझी काहीही चूक नव्हती.
सुशांतला नेहमी त्याच्या आयुष्यात पुढे जायचं होतं जे त्यानं केलं. तो त्याच्या आयुष्यात त्याच्या मार्गाने निघून गेला. पण त्यासाठी मी चुकीची आहे का? मला त्रास देणं बंद करा. हे खूप वे.दनादायी आहे, असं अंकिताने म्हटलं आहे.
तसेच पुढे अंकिता म्हणााली की, मी सुद्धा डि.प्रेशनचा सामना केला आहे. पण मी कोणालाही सांगितलं नाही. मी खूप वाईट परिस्थीतीत होते. मी त्यावेळी खूप रडले होते. त्यावेळी माझे काही चाहते आणि फक्त माझे कुटुंबीय माझ्यासोबत होते. मला दो.ष देणं बंद करा. कारण मी या सीनमध्ये कोठेच नाही.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची ओळख ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. हे दोघेही या मालिकेत लीड रोलमध्ये होते. याच सेटवर त्यांची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.
हे दोघे जवळपास तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या काळात या दोघांचे अनेक फोटोज व्हायरल झाले होते. हे दोघे काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहत होते. अनेकांना या दोघांची जोडी खूप पसंत होती.
मात्र, 3 वर्षांनी या दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता. अंकिताने नुकतंच एका वाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अंकिताने अनेक खुलासे केले होते. यावेळी तिने सुशांत आणि तिचा ब्रेकअप का झाला होता? याविषयी देखील सांगितलं होतं.
अंकिताने आणि सुशांतने अत्यंत समजूतदारपणे आपलं नातं संपवल्याचं अंकिताने यावेळी म्हटलं होतं. अंकिता सुशांतबद्दल खूप इन्सिक्योर झाली होती. त्यामुळे ती सुशांतपासून दूर गेली होती, असं कारण अंकिताने यावेळी सांगितलं आहे. अंकितासोबत ब्रेकअप झाल्यानंतरच सुशांतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
“भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”
अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!
कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!
‘मला डुक्कराच्या बड्डेला जायचंय’; चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ
दिलासादायक! वीज बिलासंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले….
“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा”