राज्यातील सरकारबाबत नाशिकच्या अनिकेत शास्त्री यांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिला आहे. राज्यात गेले तीन दिवस झालं मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. अशात राज्यातील सरकारसंदर्भात नाशिक येथील अनिकेत शास्त्री यांनी सर्वात मोठा दावा केला आहे.

अनिकेत शास्त्री जोशी राज्यात सत्ता बदल होण्याचे संकेत दिले आहे. जोतिष शास्त्रानुसार राज्यात सत्ता बद्दल होण्याची शक्यता अनिकेत शास्त्री जोशी यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत असून येणाऱ्या महिन्यात नैसर्गिक आपत्तीची देखील शक्यता असल्याचा दावा ज्योतिष अभ्यासक स्वामी अनिकेतशास्त्रींनी केला आहे.

पुढच्या काही दिवसात पक्ष फुटणे, सरकार बरखास्त होणे अशा घटना शक्य असून राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्फोटक वातावरण तयार होणार आहे, असं अनिकेत शास्त्री यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शनी, मंगळ, राहू, केतू ग्रहांच्या दुष्प्रभावाचा काही राजकीय पक्षांना मोठा फटका बसणार असल्याचा दावा ज्योतिषाचार्य महंत स्वामी अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार फक्त…’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

गुवाहाटीत एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन; वर्षावर आता ‘इतकेच’ आमदार उरले

“काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं पण…”; बंडखोर आमदाराचं खुलं पत्र

शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या पत्राने खळबळ; बडवे उल्लेख करत केले अत्यंत गंभीर आरोप

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता