कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

मुंबई | कोट्यवधींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. भोसले यांच्यासोबत काही बँक अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भोसले आणि त्यांचे काही नातेवाईक अडचणीत आले आहेत.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री ही कारवाई केली आहे. अनिल भोसलेंसह एकूण 4 जणांना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत घोटाळ्या झाल्याचे उघड झाल्याने ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसले यांच्यासह तानाजी पडवळ, शैलेश भोसले, एस. व्ही. जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वैयक्तिकरित्या टीका केली होती. त्यामुळे अजित पवारांशी पंगा घेणं भोसले यांना महागात पडल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार; आठवलेंचा खळबळजनक आरोप

-मुख्यमंत्र्यांची अवस्था रबराच्या बाहुलीसारखी झाली आहे- रावसाहेब दानवे

-पृथ्वीबाबांच्या निशाण्यावर फडणवीस; समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप

-“ठाकरे सरकार 15 दिवसांत पडेल.. त्यामुळे सेना-भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं”

-दिल्ली पोलिसांनी हातात काय बांगड्या भरल्यात काय?; मशीदीवर भगवा लावल्याने काँग्रेस नेता भडकला