पुणे महाराष्ट्र

नाहीतर बारामतीत झालेलं एवढं मोठं काम पाहण्यापासून मुकलो असतो; भाजपच्या या मंत्र्यांचं वक्तव्य

बारामती |   गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांनी तर अगदी बारामती जिंकायची असा चंग बांधला. तर भाजपचेच वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत पवार कुटुंबांनी केलंलं काम पाहून अजित पवार यांना हरवणं, हा फक्त आशावाद आहे, असं म्हटलं. त्यांच्याच पावलावर राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पाऊल टाकलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आदेश दिल्याने मी बारामती पाहण्यासाठी इथे आलो. मी जर बारामती पाहण्यासाठी आलो नसतो तर बारामतीत झालेलं एवढं मोठं काम पाहण्यापासून मुकलो असतो, असं वक्तव्य कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी केलं आहे.

अनिल बोंडे यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांनी बारामतीत केेलेल्या कामांवर स्तुतीसुमने उधळली.

राज्याच्या मंत्रीमंडळात शेतकरी प्रश्नांची जाण असणारे एकमेव मंत्री म्हणजे डॉ. अनिल बोंडे, अशा शब्दात अजित पवार यांनी बोंडेंची स्तुती केली. अजित पवार यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अनिल बोंडे बारामतीत सपत्निक आले होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती शहराचं आणि पवार कुटुंबाचं तोंडभरून कौतूक केलं.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बदलात डॉ. अनिल बोंडे यांना कृषीमंत्रीपदाची संधी मिळाली. खरं तर फार थोड्या काळासाठी त्यांना ही संधी मिळाल्याने त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असं अजित पवार म्हणाले.

IMPIMP