मुंबई | काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या आक्रमक स्वभावासाठी राज्याच्या राजकारणात ओळखले जातात. पण त्यांच्या स्वभावानं त्यांना अनेकदा अडचणीत टाकलं आहे.
नाना पटोले यांनी भंडारा येथे गावकऱ्यांना संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. टीका करत असताना नानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच फैलावर घेतलं होतं.
मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.
नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपनं राज्यभरात आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण नानांवर जोरदार शाब्दिक हल्ला करत आहेत.
नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करताना भाजप आमदार अनिल बोंडेंची जीभ घसरली आहे. नानांवर वादग्रस्त शब्दांचा प्रयोग करत त्यांनी टीका केली आहे.
काॅंग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यासारखी भुंकायची शर्यत लागली आहे. सोनिया गांधींना खुष करण्यासाठी नानांनी टीका केली आहे. परिणामी सध्या बोंडे देखील चर्चेत आहेत.
मालकिणीला खुष करण्यासाठी भुंकण्यासह मोदींना चावण्याचीही धमकी त्यांनी दिली आहे. नाना पटोले हे मालकिणीचे प्रामाणिक कुत्रा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य बोंडेंनी केलं आहे.
नाना पटोलेंनी माझा इशारा आहे की त्यांनी आपली बोटे सांभाळून ठेवावीत. शाहिस्तेखानाची फक्त बोटेच छाटली होती तुझा तर पुर्ण पंजाच छाटला जाईल, अशी टीका बोंडेंनी केली आहे.
अमरावतीवरून पोरं निघाली आहेत. नानानं आपला पंजा सांभाळून ठेवावा, असा इशारा बोटेंनी दिल्यानं राज्याच्या राजकारणात चांगलाच वाद रंगला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोलत होतो, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”
‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला
नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती