मुंबई | राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी एक दिवसाच्या जामिनावर मुक्तता करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे.
कायमस्वरूपी आमदार असल्याने अर्जदार (देशमुख) हा राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे, असं अनिल देशमुख यांनी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश के के पाटील यांनी शुक्रवारी ईडीला देशमुख यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी 6 जून रोजी होणार आहे.
अर्जदाराला आपला मतदानाचा हक्क पूर्ण करायचा आहे आणि मतदान करायचं आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात मतदान विधानभवनाच्या आत होणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या एस्कॉर्टची कमतरता भासणार नाही, या अर्जात असं नमूद करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेच्या निधनानंतर गायिकेचा धक्कादायक खुलासा!
“मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवाय, मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही”
’15 दिवस वाट पाहून…’; वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
दहावी, बारावीच्या निकालाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती!