“…त्यावेळी अनिल देशमुखांनी मदत केली”, नितीन गडकरींनी मानले आभार

नागपूर | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी 100 कोटी वसूलीचे धक्कादायक आरोप केले होते. त्यानंतर मनीलॉंड्रिंग प्रकरणात 2 नोव्हेंबरला ईडीकडून अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.

सध्या अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यातच आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत.

काटोल नगरपरिषदेच्या आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानतो, असं म्हटलं आहे.

नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा आज शुभारंभ झाला आहे. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले होते. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचं मी त्यांना सांगितलं.

इतक्या वर्षात इथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही. तुम्ही कुठे घुसवत आहात? त्रास द्यायचे काम कशाला करता, असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.

अनिल देशमुखांनी मदत केली तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतचं नव्हती. या रस्त्याकरता त्यांचेही आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करून हा रस्ता पुर्ण होणार असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

तसेच नागपूरमध्ये रस्ता चौपदरी करण्यात येणार असल्याचही नितीन गडकरींनी सांगितलं आहे. अनिल देशमुखांचे आभार मानतानाचं नितीन गडकरींनी वनअधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.

दरम्यान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी  पैशांची मागणी केली नव्हती ,असा जबाब दिला होता.

अनिल देशमुख यांच्या अटकेवरून  राष्ट्रवादी काँग्रेसकडून(NCP) संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून मुद्दाम कोणतेही कारण नसताना अनिल देशमुख यांना अटक करून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! गेल्या 24 तासातील धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

“…म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं”

कोरोनाचा हाहाकार! ‘या’ राज्यात उद्यापासून शाळा-काॅलेज बंद, नाईट कर्फ्यू लागू

तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर