मुंबई | स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकीटचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं. मात्र निर्मला सीतारमन यांचं ते वक्तव्य खोटं असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार करत आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला धक्काच बसला. पण ते खोटं आहे. रेल्वेचं तिकीट केंद्र सरकार देत नाही. त्याचा सर्व भार राज्य शासन उचलत आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
याअगोदर जे मजूर रेल्वेमार्फत गेले त्या सर्व श्रमिकांकडून पैसे घेतले गेले. मजुरांजवळ काम नाही. त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे मजुरांचा प्रवास मोफत करा, अशी मागणी आम्ही त्याचवेळी केली होती. मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही, अंस अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे. तरीही अर्थमंत्र्यांकडून दावा करण्यात आला की, मजुरांच्या प्रवासाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. हे खरं नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
-“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”
-संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर
-निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…
-महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे
-पृथ्वीराज बाबांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्यापासून कोण रोखतंय बघतेच- तृप्ती देसाई