राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

मुंबई | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आजपर्यंत 191 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यातून 2,45,000 स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मिर आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील कामगारांचा यामध्ये समावेश आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

बिहार आणि पश्चिम बंगालच्या सरकारनं रेल्वेसाठी परवानगी दिली नसल्याने या राज्यांकडे आपण रेल्वे गाड्या पाठवू शकलो नव्हतो. यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर आजपासून पश्चिम बंगालकडे सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी पहिली गाडी रवाना झाली तसेच बिहारकडे देखील एक गाडी गेली, असं देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, या सर्व परप्रांतीय मजुरांना पाठवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 55 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत. कुठल्याही कामगाराकडून तिकिटाचे पैसे घेतले जात नाहीत, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे

-शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

-आमदार धीरज विलासराव देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर; खते बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ

-तुम्ही पंतप्रधान असता तर कोणता निर्णय घेतला असता?; राहुल गांधी म्हणतात…

-‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक