अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती.

मुंबईतील अनेक बार आणि रेस्टॉरंटमधून तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दरमहिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप पत्रातून करण्यात आला होता.

यानंतर लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली होती. राज्य सरकारने चांदीवाल आयोग नेमला होता.

चांदीवाल आयोगाने चौकशी करून आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयोगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिला.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला.

मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली. यामुळे आता लवकरच अनिल देशमुख जेलमधून सुटणार असल्याची माहिती समोर आली.

महत्त्वाच्या बातम्या- 

रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर 

“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर 

“किरीट सोमय्या भाजपचे नाच्या आहेत, आणि देवेंद्र फडणवीस….” 

स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर…