मुंबई | राज्यासह देशात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं प्रकरण गाजत आहे.
अनिल देशमुख यांना सचिन वाझेमार्फत पैशांचा पुरवठा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप केले होते.
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ठाकरे सरकारनं चांदिवाल आयोगामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.
सध्या चांदिवाल आयोगाकडून देशमुख, वाझे आणि सिंह यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान आयोगाला दररोज नवीन खुलासे ऐकायला मिळत आहेत.
चांदिवाल आयोगासमोर वाझेंचे वकील अॅड. नायडू यांनी देशमुखांना प्रश्न विचारले. अनिल देशमुखांची वाझेंच्या वकिलांनी उलट तपासणी केली आहे. या तपासणीदरम्यान त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.
नायडू यांनी देशमुख यांना फेक टीआरपी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, परमबीर सिंग प्रकरण या प्रकरणांवर प्रश्न विचारले आहेत. यापैकी देशमुख यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आणि मास्कचा काळा बाजार प्रकरणात तुम्ही सचिन वाझेंना तांत्रिक मदतीसाठी तुम्ही सचिन वाझेंना निर्देश दिले होते का?, असा प्रश्न नायडू यांनी देशमुखांना विचारला होता.
देशमुख यांनी या नायडू यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना मी सचिन वाझेंना ओळखत नाही, असं उत्तर दिलं आहे. परिणामी आता या तपासात आणखीन काय खुलासा होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘घोटाळा झालाय, चौकशी करा’; अण्णा हजारे यांचं अमित शहांना पत्र
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण
“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”
“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”
अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले