अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीने 5 वेळा नोटीस बजावल्यानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख अटकेत आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठा खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होतं, असं देखील राऊत म्हणाले आहेत.

देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवार यांच्यावर दबावात होते का?, असा सवाल संजय राऊतांना विचारला होता. त्यावर मला असं वाटत नाही, असं उत्तर संजय राऊतांनी दिला आहे.

आम्हाला जनाब सेना म्हणता मग भाजपने अल्पसंख्याक सेल कुणासाठी निर्माण केला?, मग आम्ही तुम्हाला मियाँ खान मौलाना म्हणायचं का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

दरम्यान, नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यावर राष्ट्रवादीसह इतर आघाडीच्या घटक पक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच तापल्याचं मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”

“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच” 

“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”

“राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजे” 

पेट्रोल डिझेलनंतर गॅस दरवाढीचा भडका; आता सिलेंडरसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये