Top news मनोरंजन

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता चित्रपट सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्दर्शकाचं नि.धन झालं आहे.

अभिनेता अजय देवगण याचा भाऊ अनिल देवगण याचं अचानक नि.धन झालं आहे. अनिल देवगणचं अचानक नि.धन झाल्यामुळे  देवगण कुटुंबियांबरोबरच संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री देखील दुःखात बुडाली आहे. अजय देवगण यांनी स्वतः ट्वीटरवरून भावाच्या नि.धनाची वार्ता दिली आहे.

काल रात्री मी माझ्या भावाला गमावले. अनिल देवगणवर काळाने असा अचानक घाला घातल्यानं संपूर्ण देवगण कुटुंब दुःखात बुडाले आहे. एडीएफएफ आणि मी त्याला मिस करत आहोत. त्याच्या आ.त्म्यास शांती लाभो. साथीच्या आजारामुळे कोणत्याही प्रकारची शोक सभा घेण्यात येणार नाही, असं ट्वीट अजय देवगन याने केलं आहे.

अजय देवगननं या ट्वीटसोबत अनिल देवगणचा एक फोटो देखील शेअर केला आहे. अजय देवगणच्या या ट्वीटवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनिल देवगनच्या आ.त्म्यास शांती लाभो, अशी सर्वजन प्रार्थना करत आहेत.

अनिल देवगणनं 1996 साली इंडस्ट्रीत सहायक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 1996 साली ‘जीत’ या चित्रपटात अनिलनं प्रथम सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटात सलमान खान, सनी देवोल आणि करिष्मा कपूर मुख्य भूमिकेत होते.

यानंतर अनिल देवगणनं 2000 मध्ये दिग्दर्शक म्हणून ‘राजू चाचा’ या चित्रपटाचं काम पाहिलं. या चित्रपटात अनिलचा भाऊ अजय देवगन स्वतः मुख्य भूमिकेत होता. तसेच ऋषी कपूर, संजय दत्त, काजोल असे इतरही कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

‘हाले-दिल-है’ हा अनिलनं दिग्दर्शित केलेल्या शेवटचा चित्रपट आहे. 2008मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉलीवूडमध्ये अनेक हिट पिक्चर काढणाऱ्या दिग्दर्शकावर काळाने घाला घातल्यानं संपूर्ण इंडस्ट्री शोक व्यक्त करत आहे.

दरम्यान, अद्याप अनिल देवगणच्या मृ.त्युचं नेमकं कारण समजू शकलं नाही. गेल्या वर्षीच 27 मे रोजी अजय देवगणचे वडील विरू देवगण यांच नि.धन झालं होतं. विरू देवगन यांच्या नि.धनाचं दुःख ताज असतानाच देवगण कुटुंबावर आणखी मोठं दुःख ओढावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!

स्पर्धेच्या मध्यातच दिल्लीच्या संघानं बदलली जर्सी; नवी जर्सी पहाल तर फिदा व्हाल!

अभिनेता अजय देवगनला मोठा धक्का; घरातील ‘या’ खास व्यक्तीला कायमचं गमावलं!