मुंबई | भाजपमधील काही वरिष्ठ नेते पक्षावर आणि राज्याच्या पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. उघडउघड त्यांनी तशी भूमिका देखील घेतलेली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांची नावे प्रामुख्याने यामध्ये घ्यावी लागतील. आता जर हे नेते भाजपमध्ये नाराज आहेत तर मग पक्ष का सोडत नाहीत? कशासाठी पक्षात थांबले आहेत? असा खडा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी विचारला आहे.
मी पक्षातील चुकीच्या गोष्टींवर बोलायचो तेव्हा हे सगळे जण गप्प होते अन् आता हे बोलायला लागलेत. पण जर खरंच अन्याय होतोय तर संबंधितांनी पक्षातून बाहेर पडावं आणि स्वत:चा आत्मसन्मान जपावा, असा सल्ला गोटे यांनी दिला आहे.
माझ्या आत्मसन्मानाला जेव्हा ठेच लागली तेव्हा मी लगेच पक्ष सोडला. मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टींवर माझं मत मांडलं किंबहुना टीकाही केली. हे नेते पक्षावर खरंच नाराज असतील तर मग पक्षातून बाहेर का पडत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या घरी ओबीसी नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे. ओबीसी नेत्यांना संपवण्याचं कटकारस्थान सध्याचं पक्षनेतृत्व करत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जेलमधून बाहेर येताच पी. चिदंबरम यांचा सरकारवर बरसले! – https://t.co/bhrvZFWgBE @PChidambaram_IN @INCIndia @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती” – https://t.co/VhBBCBrDmb @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
अन् उदयनराजे म्हणाले… सॉरी चुकलं माझं! – https://t.co/vMXBu2GL4s @shindespeaks @Chh_Udayanraje @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019