मुंबई | अभिनेते अनिल कपूर सध्या चित्रपट सृष्टीपासून बरेच लांब आहेत. अनिल कपूर जरी चित्रपट सृष्टीपासून लांब असले तरी ते रिअॅलिटी शोजमध्ये केव्हातरी प्रमुख पाहुणे म्हणून झळकतात. ते नेहमीच जिवनाची दिलखुलासपणे मजा घेताना दिसतात.
सध्या अनिल कपूर यांचा असाच एक मुलीच्या लग्नात दिलखुलासपणे डान्स करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांची धाकटी मुलगी रिया हिचं 14 ऑगस्ट रोजी लग्न झालं. रियाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं. कोरोना महामारीमुळे लग्नाला काही मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
लग्न झाल्यानंतर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. रिसेप्शनला देखील काही मोजकेच कलाकार आणि पाहुणेमंडळी उपस्थित होते. या रिसेप्शनमध्ये डान्स करतानाचा अनिल कपूर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अनिल कपूर फूल मजा लूटताना दिसत आहेत.
कोरिओग्राफर आणि निर्माती फराह खान देखील रियाच्या रिसेप्शनला उपस्थित होती. फराहनेच अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर यांच्या हातात ज्यूसचा एक ग्लास दिसत आहे. हातात ज्यूसचा प्याला घेऊन अनिल कपूर झकास डान्स करत आहेत.
अनिल कपूर यांच्यासोबत त्यांची मुलगी रिया देखील डान्स करताना दिसत आहे. हे दोघे बापलेक सोनम कपूरच्या ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यावर डान्स करत आहेत. उपस्थित सर्वजण रिया आणि अनिलच्या या डान्सला टाळ्या वाजवून दाद देत आहेत.
रिसेप्शनमध्ये अनिल कपूर यांनी पिवळ्या रंगाचा सूट तर रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत फराह खान म्हणाली की, या माणसावर खरंच प्रेम आहे. एक वडील आणि मुलीचा मी पाहिलेला सर्वात सुंदर डान्स.
अनिल कपूर यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला भरभरून प्रेम दर्शवत आहेत. तसेच व्हिडीओवर कमेंट करत या बापलेकीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, रियाने तिचा बॉयफ्रेंड करण बुलाणी याच्याशीच लग्न केलं आहे. करण आणि रिया गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 14 ऑगस्ट रोजी अनिल कपूर यांच्या जुहू मध्ये असलेल्या घरी या दोघांचं लग्न पार पडलं.
महत्वाच्या बातम्या –
माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा
‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत कॅन्सरच्या उपचारानंतर दोन चिमुकल्यांची पहिली भेट, पाहा व्हिडीओ
राखी सावंतचा ‘स्पायडर मॅन’ डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ
लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ
…म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय; पोस्ट शेअर करत मलायकाने व्यक्त केली भावना