मुंबई | मागील काही महिन्यांपासून ईडीने (ED) महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते आता संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
अशातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सात्त्याने टीका करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचं टेन्शन वाढवलं आहे.
आता तुरुंगात जाण्याचा पुढचा क्रमांक चिट्ठीमध्ये आपोआप अनिल परब यांचा आला असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आलंय, असंही ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदी सरकारने दापोली न्यायालयात केस केली. त्यात सर्व पुरावे दिले होते. म्हणून आता अनिल परब यांनी लवकर बॅग भरावी, असं कारण किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
दरम्यान, ईडीच्या या कारवाईची किरीट सोमय्यांना आधीच माहिती कशी असते, असा सवाल आता आघाडीचे नेते विचारत आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकार देखील कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं
“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”
Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर
“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी