महाराष्ट्र मुंबई

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर जनतेशी संवाद साधताना रेल्वेकडे 80 ट्रेन मागितल्या तर 30 ते 40 ट्रेन मिळतात असं सांगितलं होतं. या वक्तव्याचा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना एवढा राग आला की 30 मे पर्यंत आमची 178 ट्रेनची मागणी होती. मात्र त्यांनी एकाच दिवसात 152 ट्रेन देवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं.

पियुष गोयल यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरलं, असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला अनिल परब यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. याशिवाय गुजरातला 1500 ट्रेन आणि महाराष्ट्राला फक्त 700 ट्रेन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

गेल्या दोन दिवसात रेल्वे मंत्री पियुष गोयल हे ट्विटरवर सारखं सांगत आहेत की, आम्ही ट्रेन पाठवतो. पण, महाराष्ट्र श्रमिकांना पाठवत नाही, असा आरोप करत आहेत. माझ्याकडे काही फोटो आहेत. फोटोत हजारोंच्या गर्दीने ट्रेनची वाट पाहत उभे राहिलेले हे श्रमिक नाहीत का?, असा सवाल अनिल परब यांनी केलाय.

आम्ही एसटी आणि बीएसटीच्या मदतीने लोकांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवत होतो. यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जात होतं. पण परवापासून जाणीवपूर्वक स्टेशनवर गर्दी करायची आणि सरकारला बदनाम करायचं, असा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस

-भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

-‘फडणवीसांची आकडेवारी आभासी’; फडणवीसांच्या दाव्याची ठाकरे सरकारकडून पोलखोल

-नारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

-सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात; डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक