“नितेश राणेंना अटक झाल्याशिवाय जामीन मिळणार नाही”; अनिल परब यांचा दावा

सिंधुदुर्ग | राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारं संतोष परब हल्ला प्रकरण कोकणात कणकवलीमध्ये घडलं होतं. या प्रकरणात भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख सतीश सावंत हे होते. त्यांच्या प्रचाराची सर्व धुरा ही शिवसैनिक संतोष परब यांच्यावर होती.

संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. परब यांच्या तक्रारीनंतर आमदार नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता.

राणे यांनी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केले पण सर्वोच्च न्यायालयानं देखील त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता.

आता सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं परत एकदा जामीन देण्यास नकार दिला आहे. परिणामी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशात राज्यातील राजकारण मात्र चांगलंच पेटलं आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांनी नितेश राणे प्रकरणावर वकिली भाषेत उत्तर दिलं आहे. नितेश राणेंना जामीन हवा असेल तर आधी अटक व्हावी लागेल, असं वक्तव्य अनिल परब यांनी केलं आहे.

जामीनासाठी अर्ज करण्यासाठी पहिल्यांदा अटक व्हावी लागते. म्हणून जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन होत नाही. या कारणास्तव सत्र न्यायालयानं जामीन अर्ज नाकारला, असं परब म्हणाले आहेत.

एखाद्या व्यक्तिला जीवानिशी मारणे हा फार मोठा गुन्हा आहे. 302 हा सर्वात मोठा गुन्हा असतो. त्यानंतर माणसाला मारण्याचा प्रयत्न करणं यासाठी 307 गुन्हा दाखल होतो. त्यासाठी कायद्यामध्ये फार मोठी शिक्षा आहे, असंही परब म्हणाले आहेत.

गंभीर प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडून झाला आहे. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त जी शिक्षा असेल ती त्यांना मिळेल, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. परिणामी वादाला तोंड फुटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, हिंदुस्थानी भाऊवर रुपाली पाटील कडाडल्या

रणबीरचा ‘हा’ चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली नोकरी, जाणून घ्या काय होतं कारण

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच निलेश राणेंचा न्यायालयाबाहेर राडा, पोलिसांशी बाचाबाची

 Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर