कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय!

मुंबई | राज्य सरकारने 31 मार्चपर्यंतचा शेवटचा अल्टिमेटम संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र, अद्यापही कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे आता परिवहन मंत्र्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचं वारंवार आवाहन केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सात वेळा कामावर परतण्याचं आवाहन केलं. त्यांच्यावरील कारवाया मागे घेण्याचंही म्हटलं. पण असा एक समज झाला आहे की, फक्त प्रशासन सांगत आहे आणि करत काहीही नाहीये. त्यामुळे जेवढे उपलब्ध कर्मचारी आहेत त्यांना घेऊन आम्ही एसटीची सेवा सुरू करत आहोत, असं अनिल परब म्हणालेत.

या व्यतिरिक्त आम्ही 11 हजार कंत्राटी चालक, वाहक यांची नेमणूक करण्यासाठी टेंडर तयार आहे. एसटीचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एसटीची सेवा ग्रामीण भागात चालते, जवळपास 12 हजार फेऱ्या चालतात त्यापैकी अधिकाधिक फेऱ्या नव्या रचनेत कशा होतील याबाबतही आमची तयारी सुरू आहे, असंही परब म्हणालेत.

नियमानुसार जी-जी कारवाई करायची असते ती सर्व कारवाई नियमानुसार केली जाईल. मग त्यामध्ये निलंबन असेल, त्यामध्ये बडतर्फी असेल, त्यामध्ये कदाचित सेवा समाप्ती असेल पण जी कारवाई होईल ती नियमानुसार होईल, असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra Government) वारंवार आवाहन करुन आणि अल्टिमेटम देऊन सुद्धा राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर 

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर; ‘या’ तारखेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी

सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ‘या’ गोष्टी महागणार 

“…म्हणून ईडीने धाड टाकली”, सतीश उकेंच्या अटकेनंतर नाना पटोलेंचे गंभीर आरोप 

IPL 2022: ना मुंबई ना दिल्ली, मॅथ्यू हेडन म्हणतो ‘हा’ संघ यंदा IPL जिंकेल