मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या दापोली दौऱ्यावरुन कोकणात राजकीय वातावरण तापलं आहे.
किरीट सोमय्यांच्या या दौऱ्यात अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आपण तोडून दाखवणारच असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी थेट रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत थेट दापोलीच्या दिशेने निघाले आहेत. अनिल परब (Anil Parab) यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
आज सकाळपासूनच किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांमुळे वातावरण चांगलंच पेटलं आहे.
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावरुन दापोलीत प्रशासन अलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खरबरदारी घेत आहे.
पोलीस प्रशासनाने दापोलीत जमावबंदी लागू करत शहरातील नाक्या नाक्यात बॅरिकेट लावून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अनिल परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुलुंड येथील आपल्या निवासस्थानावरुन निघताना किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने कूच केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, पाहा फोटो
‘सेनेचं मानसिक संतुलन बिघडलंय’; चित्रा वाघ भडकल्या
‘आमदारांना मोफत घर मिळणार नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
“…तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार चालणार”