Top news मनोरंजन

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे सतत चर्चेत आहे. सुशांत संबंधित अंकितानं अनेक गोष्टी सोशल मीडियावरून शेअर केल्या आहेत. तसेच अंकिता अलीकडच्या काही दिवसांत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांबरोबर सतत काही न काही शेअर करत आहे.

अंकिता अलीकडे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत आहे. अंकितानं शेअर केलेल्या गोष्टी सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. अशातच आता अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता तिचं कुटुंब आणि बॉयफ्रेंड विकी जैन सोबत दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. अंकिताच्या या व्हिडीओमुळे काही लोक अंकिताला चांगलंच ट्रोल करत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुशांतचे चाहते अंकितावर चांगलेच चिडले आहेत. अंकिताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिनं  सुशांतला तिच्या आयुष्यातून जावूच का दिलं?, असा सवाल अंकिताला विचारत एका युजरनं सुशांत या जगात नसण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.

तुला तुझ्या जिवनात भरपूर आनंद मिळो, सुशांतला जर असच तुझ्यासारखं जीवन मिळालं असतं तर तो आज या जगात असता. तू सुशांतला तुझ्या जिवनातून जावूच का दिलं? एकवेळ सुशांतला भेटून त्याला त्याचे हाल तरी तू विचारायला हवे होतेस. सुशांतच्या आयुष्यात खूप काही घडतंय हे तुला माहित असताना देखील तू काहीही केलं नाहीस. सुशांतशी सर्व नाती तोडून देखील तू खूप खुश होतीस, असं म्हणत या युजरनं सुशांतवर राग व्यक्त केला आहे.

अंकिता लोखंडेनं शेअर केलेल्या व्हिडीओत तिनं जगातील सात आश्चर्यांविषयी देखील सांगितलं आहे. मात्र, अंकिता लोखंडेच्या मते हे सात आश्चर्य म्हणजेच आई, वडील, भाऊ, बहिण, प्रेम, मित्र, मुलं मुली आणि नातवंडे आहेत. अंकिताची हा व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.

दरम्यान, अंकिता लोखंडे यापूर्वीही सोशल मीडियावर तिनं शेअर केलेल्या एका फोटोमुळे चांगलीच ट्रोल झाली होती. या फोटोत अंकितानं ग्रे रंगाचा टॉप आणि ओम प्रिंटचा पायजमा घातला होता. तसेच अंकिताच्या आईनं केलेल्या हेअर स्टाईलमुळं ती फोटोत खूप आनंदी दिसत आहे.

मात्र, अंकितानं ओम प्रिंटचा पायजमा घातल्यामुळे अंकिताचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. अंकिताच्या चाहत्यांनी तिला असा पायजमा न घालण्याचा सल्ला दिला होता. पायजम्यावर ओम प्रिंट असणं हा खूप मोठा अपराध केल्यासारखं आहे, असं काही लोकांचं म्हणणं होतं. या फोटोमुळं अंकिता चांगलीच ट्रोल झाली होती.

 

View this post on Instagram

 

Can u replace these 7wonders of your life ?? No I don’t think so … Wonders of my life 💕

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

महत्त्वाच्या बातम्या-

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला

तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!

महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत