इंदापूर | तालुक्यात दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही, असं म्हणत जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील-ठाकरे (Ankita Patil Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर टीका केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्स्या भारती मोहन दुधाळ यांनी केलेल्या शिफारशीनुसार मंजूर करण्यात आलेल्या कौठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या 22 लाख 50 हजार रुपये विकास निधीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्र्यांनी दडपशाहीचा वापर करण्यात आला, असं त्यांनी म्हटलं.
स्थानिक तसेच पोलीस प्रशासनाचा वापर करीत या विकासकामाला अडथळा निर्माण केला असून अशा दडपशाहीचे राजकारण चालू देणार नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली.
कौठळी येथे जवळपास 42 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण अंकिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन 3 वर्ग खोलीसाठी 22.50 लक्ष रूपये, माने भंडलकर वस्ती महादेव मंदिर सभामंडपासठी 4 लक्ष, नवीन अंगणवाडी इमारत बांधकामसाठी 8.50 लक्ष,भीमराव काळेल वस्ती ते बळपुडी रोड कडे जाणारा रस्त्यासाठी 5 लक्ष व गावठाण येथे हायमास्ट दिवा हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या भारतीताई दुधाळ त्यांनी मंजूर केलं असल्याचं अंकिता पाटील ठाकरे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती देवराज भाऊ जाधव, माजी सरपंच प्रकाश काळेल, सोशल मीडिया अध्यक्ष साहेबराव पिसाळ, भारतीय जनता पार्टी विस्तारक राजकुमार जठार व कौठळी गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय
मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची
‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा
‘असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं’; केसरकरांचा राणे पितापुत्रांवर हल्लाबोल!
“यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे जुन्यांना मूठमाती आणि नव्यांना गाजर दाखवणारा आहे”