‘चित्रपटात काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’; प्रसिद्ध निर्मात्याबद्दल अंकिताचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | चित्रपट सृष्टीत घडणारी कास्टिंग काऊचची प्रकरणे काही नवीन नाहीत. आत्तापर्यंत अनेक बड्या अभिनेत्रींनी चित्रपट सृष्टीत त्यांच्याबर झालेल्या वाईट वर्तणुकींबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. अशातच आता आणखी एका बड्या अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीत नवीन असताना तिच्याबर घडलेला एक वाईट किस्सा सांगितला आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचली आहे. तिने नेहमीच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र अंकीताला मनोरंजन विश्वात मोठा ब्रेक मिळण्याअगोदर खूप कडू गोड अनुभव आले आहेत.

याच अनुभवांविषयी अंकिताने आता एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तिने या मुलाखतीत तिच्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रकारणाबद्दल सांगितलं आहे. एका बड्या चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गलि.च्छ व्यवहार केल्याचं अंकिताने सांगितलं आहे.

या मुलाखतीत बोलताना अंकिता म्हणाली की, मी लहान असताना एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला बोलावण्यात आलं होतं. तिथे एका माणसाने त्याला काहीतरी बोलायचं आहे सांगून मला एका खोलीत बोलावलं. यानंतर त्याने मला सवाल केला की, तुला कॉंप्रमाईज करावं लागेल तुझी तयारी आहे ना?

यावेळी मी 19-20 वर्षांची असेल. त्यावेळी मी त्या व्यक्तीला बोलले की सांगा मला कोणतं कॉंप्रमाईज करावं लागेल? मी देखील यावेळी मुद्दाम त्यांची शाळा घेतली. त्यांना अनेक उलटे सवाल मी विचारले.

तसेच पुढे मी त्यांना म्हणाले की, तुम्हाला एक चांगली अभिनेत्री नको आहे तर झोपण्यासाठी एक मुलगी हवी आहे का? या घटनेनंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि मला काम देण्यास ते तयार असल्याचं सांगितलं.

मात्र, मी त्यांच्या कामाला साफ नकार दिला. तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी एका बड्या निर्मात्याने देखील माझ्यासोबत असं गैरवर्तन केलं होतं. परंतु मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही, असा गौप्यस्फोट देखील अंकिताने या मुलाखतीत बोलताना केला आहे.

दरम्यान, अंकिताने केलेल्या या खुलाश्यानंतर पून्हा एकदा चित्रपट सृष्टीतील कास्टिंग काऊचची प्रकरणे चर्चेचा विषय ठरत आहेत. लोक सोशल मीडियावर याबद्दल आपली मतं मांडू लागली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘माझा दात काढू नका कारण…’; ‘या’ चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

“आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये”

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्रशासनाने घेतला…

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी…

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!