…अन् मलायका पँट न घालताच टेबलवर येऊन बसली; मलायकाने शेअर केला तो भन्नाट किस्सा

मुंबई | बॉलिवूड मधील काही कलाकार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनेत्री मलायका अरोरा देखील या न त्या कारणाने चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांबर अनेक गोष्टी शेअर करताना दिसते.

सोशल मीडियावर मलायका काहीवेळा वर्क आऊटचे व्हिडीओ शेअर करते तर काही वेळा आपले बोल्ड फोटोज शेअर करत चाहत्यांना भुरळ घालते. मलायकाने आता इन्स्टाग्रामवर स्पेशल स्टोरी टाकत तिच्या आयुष्यातील दोन किस्से आपल्या चाहत्यांना सांगितले आहेत. तिचे हे दोन्ही किस्से वाचून मलायकाचे चाहते खूप हसत आहेत.

इन्स्टाग्रामवर पहिली स्टोरी टाकत मलायका म्हणाली की, अगोदर माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला मी सांगत होते की घाबरू नका मी माझ्या कुत्र्याला लस टोचवून घेतली आहे. आता मी घरी येणाऱ्या प्रत्येकाला म्हणते की घाबरू नका मी लस घेतली आहे.

तसेच पुढे आणखी एक स्टोरी टाकत मलायकाने सांगितलं की, मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेेले होते. तेव्हा मी हळूच गेट खोलला होता. मी पायाने टॉयलटची सीट उचलली. टिश्यूच्या मदतीने पाण्याचा वापर केला.

यानंतर हात धुतले आणि हाताच्या कोपऱ्याने बाथरूमचा दरवाजा बंद केला.  मी पुन्हा टेबलापाशी आले पण पुन्हा टेबलवर जेव्हा आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पँटच घालायला विसरले आहे.

दरम्यान, मलायका सिनेमांपेक्षा आपल्या फिटनेसमुळे खूप जास्त चर्चेत असते. ती अलीकडे खूप कमी चित्रपटांमध्ये दिसते. मात्र, रिऍलिटी शोजमध्ये जज म्हणून बहुतेकदा ती छोट्या पडद्यावर झळकते.

नुकतंच मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत एका पार्टीमध्ये दिसली होती. या पार्टीत मलायकाने रेड शॉर्ट आणि ट्रॅक जॅकेट घातले होते. तर अर्जुन कपूरने कॅज्युअल ब्लॅक टी-शर्ट घातले होते. पार्टीतील या दोघांच्या लुकमुळे सर्वांचाच नजरा त्यांच्यावर खिळून होत्या.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! चणे खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रशासनाने जारी…

अॅंकरने हिंदी भाषेचा वापर केला म्हणून ‘या’…

“आठवड्याच्या शेवटी लावलं जाणार लॉकडाऊन आणि नाईट…

काय सांगता! तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे चांदी;…