आण्णा तुला गर्लफ्रेंड आहे का?, तरुणीच्या प्रश्नानी राहुल गांधी क्लिन बोर्ड

पदुचेरी | तरुण पोरगा म्हणलं की सगळेजण त्याच्या लग्नाविषयी बोलून त्याची टांग खेचत असतात. असंच काहीस काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतीत होताना दिसतं आहे. राजकीय नेत्यांनाही राहुल गांंधींचं लग्न कधी होणार याविषयीची उत्सुकता लागली आहे.

आजपर्यंत राहुल गांधी यांनी आपली प्रायव्हेट लाईफ ही खासगी ठेवली असून, ती कधीच कोणाला सांगितली नाहीय. विशेष म्हणजे त्यांच्या लव लाईफ बद्दल कोणाला काही माहिती नाहीय.  मात्र काहीदिवसांपूर्वी पदुचेरीत झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधींना एका लहान मुलीने तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्न विचारला त्यानंतर उपस्थित सर्वजण हसु लागले.

त्या मुलीने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यावेळी त्या मुलीने विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधी काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र या प्रश्नाचे उत्तर मी नंतर देईन, असं म्हणत राहुल गांधी त्यावेळी वेळ मारुन नेली.

राहुल गांधी हे पदुचेरीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी राहुल गांधी नेहमीप्रमाणे पांढरा सदरा-कुर्ता न घालता निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती.

कार्यक्रमात एक मुलीने राहुल गांधी यांना ‘सर’ म्हणून हाक मारली होती. त्यावेळी मला ‘सर’ नको म्हणूस, माझे नाव काय ‘सर’ आहे का, मला राहुल आण्णा म्हण, असं राहुल यांनी सांगितलं.

पदुचेरीत सुरु असलेल्या कार्यक्रमात राहुल गांधींना तुम्हाला राजकारण क्षेत्र सोडून मित्र आहेत का?, असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी माझे खूप मित्र आहेत. काही राजकारणात आहेत. तर काही इतर क्षेत्रात आहेत. राजकारणातील काहीजण मला वैरी मानतात. मात्र मी त्यांना माझा मित्रच मानतो, असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अतिशय मनमोकळ्याने बोलत असल्याचे दिसून आलं. त्याचबरोबर त्यांच्यावर कोणताच राजकीय भार किंवा कोणती काळजी दिसत नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! सोनं तब्बल 16 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे ताजे दर

‘त्या रात्री फराह माझ्या रुममध्ये घुसली अन् मग… ‘; करण जोहरने सांगितलं मोठं सिक्रेट

कपिलची जीभ घसरली, ‘या’ कारणाने फोटोग्राफरला शि.वी देत म्हणाला…; पाहा व्हिडीओ

‘या’ अभिनेत्रीचा वॉचमन सोबत नाचतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

प्रियंकाचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, ‘या’ एका व्हिडिओमुळे मिळाल्या होत्या बला.त्काराच्या ध.मक्या