“ज्ञानेश्वर, तुकारामांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे?”

मुंबई | महाराष्ट्रातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला (Wine Sale) परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वाईन विक्रीच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी पुन्हा टीका केलीये.

तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून अमरण उपोषण करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं आहे.

तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का?, असा सवाल देखील अण्णांनी सरकारला विचारलाय.

ज्ञानेश्वर, तुकारामांच्या राज्यात वाईन संस्कृती आहे? ही संस्कृती जतन करण्यासाठी कीर्तनकार किर्तन करतात. मुलांवर संस्कार करण्यासाठी ते प्रवचन करतात. तुम्ही किराणा दुकान वाईन ठेवून ही संस्कृती बरबाद करायला निघाला, अशी टीका अण्णा हजारे यांनी केलीये.

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात विक्री केल्यास महाराष्ट्रातील बालके, तरुण महिला आणि मुलींवर खूप अन्याय अत्याचार होतील. म्हणून मी सरकारला निरोप पाठवला. सरकारचे लोक चर्चेला आले. मी सगळं ऐकलं. मी त्याला उत्तर म्हणून एकच सांगितलं. तुमचं ऐकलं. आता माझा सरकारला एक निरोप द्या. तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही. एवढा निरोप सांगा, असं अण्णा हजारे म्हणालेत.

मी असं म्हटल्यावर सरकारने हालचाली सुरू झाल्या. काल एक्साईज डिपार्टमेंटचे कमिश्नर आले. मी म्हटलं तुमच्यावर विश्वास नाही. तुम्ही वाईन का आणता आणि खुल्या बाजारात का विक्रीला ठेवता? म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं…” 

“काय फायली काढायच्या त्या काढा, जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका”

श्रीगोंद्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तीन मित्रांचा जागीच मृत्यू 

Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स 

बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल