पुणे महाराष्ट्र

अण्णा हजारेंचा इशारा; मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार!

अहमदनगर : संसदेत विधेयक मांडून मोदी सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केला आहे. या बदलाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मंगळवारी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कायद्यातील बदलामुळे जनतेचे अधिकार कमी होण्याचा धोका असून त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती अण्णा हजारे यांनी दिली.

माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये एक तरतूद आहे. यामध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असं बंधन आहे. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी आपल्या फायद्यासाठी सरकार या कायद्यात बदल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोदी सरकारकडून माहिती अधिकार कायद्यात जो बदल करण्यात आला आहेत त्याने हा कायदा कमजोर होणार आहे, हा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून अण्णा हजारेंना ओळखलं जातं. मात्र कायद्यात बदल होत असतानाच अण्णा हजारे गप्प असल्यामुळे त्यांच्यावर सोशल माध्यमांमधून जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली होती.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्याशिवाय देशभरातून माहिती अधिकार कायद्यातील या बदलाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना याविरोधात एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

-खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!

-कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

-…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

-कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

IMPIMP