“… तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल”; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई | महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारवर सर्व स्तरांतून टीका होत होती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) देखील त्यावेळी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संतापले होते. त्यावेळी अण्णा हजारे यांनी त्यांचे उपोषणाचे शस्त्र देखील उगारले होते. पण नंतर ते बारगळले.

आता अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे. हे सरकार मॉलमध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेणार नाही, अशी मला आशा असल्याचे अण्णा म्हणाले.

मॉल संस्कृती आपली नाही, ती विदेशी संस्कृती आहे. सध्याचे सरकार मॉलमध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेईल, असे मला वाटत नाही. पण जर का त्यांनी तो घेतला, तर आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, असे अण्णा म्हणाले.

राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारकडून मॉलमध्ये वाईन विक्रिचा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत, त्यामुळे वाईचा प्रश्न पुन्हा एकदा अग्रस्थानी आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वाईन विक्रिच्या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध केला होता. त्यामुळे तो निर्णय मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हा वादादीत मुद्दा डोके वर काढत आहे.

मॉलमध्ये वाईन विक्री ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीसांसोबत (Devendra Fadanvis) चर्चा करणार असल्याचे उत्पादन शूल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अलीकडे म्हंटले आहे.

मॉलमध्ये वाईन विक्री केल्यास अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, हे नवे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याने आम्ही त्यांचा विचार करत असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

नगर-अष्टी रेल्वे मार्गाच्या उद्घाटनात पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या ”गोपिनाथ मुंडे यांचे…”

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भारत जोडो’ यात्रेवरुन भाजपवर केली टीका; म्हणाल्या काँग्रेसच्या…

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे कारभार सांभाळतात! राष्ट्रवादीने दिला पुरावा

राज ठाकरेंच्या ‘मुन्नाभाई’ उल्लेखावर मनसेचे प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंना दिली ‘या’ कलाकाराची उपमा

‘काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचे मोठे वक्तव्य’