अण्णा हजारेंचे अरविंद केजरीवालांना खरमरीत पत्र; वाचा सविस्तर

दिल्ली | दिल्ली सरकारने नवीन मद्यविक्री धोरण राबविले आहे. या धोरणामुळे मद्यपान आणि मद्यविक्रिला प्रोत्साहन मिळणार आहे. या नवीन धोरणामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) वादात आले आहेत.

दहा वर्षांपूर्वी अण्णा हजारे (Anna Hajare) आणि अरविंद केजरीवाल यांनी अन्य अनेक दिग्गजांच्या साथीने दिल्लीत जनलोकपाल विधेयक आंदोलन राबविले होते. आता त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

एकेकाळी दारुबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी आवाज उठविणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर टीका केली आहे.

मद्याची जशी नशा चढते, तशी केजरीवालांना सत्तेची नशा चढली आहे, असे अण्णा हजारे म्हणाले. अण्णा हजारेंनी केजरीवाल यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी केजरीवालांना जुन्या आंदोलनाची आठवण करुन दिली आहे.

जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) अनेकवेळा राळेगणसिद्धी येथे आला होता. त्यावेळी तुम्ही राळेगणसिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले. मात्र सत्तेत आल्यावर तुम्ही सर्व विसरलात, असे अण्णा हजारे म्हणाले.

तसेच दहा वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलन स्थगित केल्यानंतर, 18 सप्टेंबर 2012 रोजी झालेल्या बैठकीत आपण राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार बोलून दाखवला.

मात्र आमचा या गोष्टीला विरोध होता. राजकीय पक्ष स्थापन करणे हे आपल्या आंदोलनाचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या  कार्यकर्त्यांबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता, असे अण्णा हजारे पत्रात म्हणाले आहेत.

ते पुढे लिहतात, आपण देशभर फिरुन जनजागृती, लोकशिक्षण करणे अपेक्षित आहे, तुम्ही तसे न करता सर्वसामान्यांची कुटुंबे उद्धवस्त करणारे मद्यपान धोरण राबविले आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बाबरी मशीद आणि गुजरात दंगलीवर न्यायालयाचा मोठा निर्णय

पोलीस इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल

जय शहा यांच्या तिरंगा नाकारण्यावर प्रकाश राज आक्रमक; ट्विट करत म्हणाले,

भाजप – मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

“एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आणि सनातन धर्माचे…” बाबा रामदेव यांचे मोठे वक्तव्य