अण्णा हजारेंनी घेतला अजित पवारांचा धसका?, ‘या’ निर्णयाची रंगलीय खमंग चर्चा

अहमदनगर | पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंगगाथा व त्यांच्या राहत्या वाड्याचा जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्याचं आमदार लंके यांनी ठरवलं होतं.

या कार्यक्रमाची फलकेही विविध ठिकाणी लावण्यात आलेली. तसेच सोशल मीडियावरूनही याची प्रसिद्धी केली गेली. पिंपळनेर हे राळेगणसिध्दी लगतचे गाव आहे, असं असूनही अण्णा हजारे यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं.

पिंपळनेर देवस्थानशी हजारे यांचे निकटचे संबंध आहे. तेथील अनेक धार्मिक कार्यक्रमांना हजारे उपस्थित असतात. ही संधी साधून राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत हजारे यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे या कार्यक्रमाचे हजारे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं.

कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हजारे यांची मनधरणी करून त्यांना पिंपळनेरला घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हजारे आपल्या नकारावर ठाम होते.

कार्यक्रम धार्मिक असला तरी विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थित होत आहे. त्यांच्यासोबत कार्यक्रमास उपस्थित राहणं योग्य ठरणार नसल्याचं हजारे यांनी संबंथित पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती आहे.

हजारे येत नसल्याचे पाहून ठरल्यावेळी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अजित पवारांसह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, निळोबारायांचे वंशज गोपाळ मकाशीर, सरपंच सुभाष गाजरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानचे सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. शिवाय शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते.

पवार कुटूंबीय व अण्णा हजारे यांचे संबंध कधीही मधूर राहिलेले नाहीत. हजारेंनी पवार कुटूंबीयांवर नेहमीच टीका केली आहे. त्यामुळे अण्णा हजारे कार्यक्रमाला आले नसल्याची चर्चा आहे.

तसेच महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनीही राळेगणसिद्धीतून जाऊनही अण्णा हजारेंची भेट टाळणंच पसंत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या  – 

‘हे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकार’; पंकजा मुंडेंचा घणाघात 

  नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; क्रांती रेडकरचे ‘ते’ कथित चॅट केले शेअर

  “एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!