औरंगाबाद | राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागलं आहे. आमचीच सत्ता येणार असा दावा देखील विविध राजकीय पक्ष करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हेच असतील, अशी माहिती दिली आहे.
विविध राजकीय पक्ष विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. वंचित बहुजन आघाडी देखील मुलाखती घेत आहेत. वंचितला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचं, पाटील यांनी सांगितलं आहे.
आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही जोमाने काम करू आणि महाराष्ट्रात वंचितचे जास्तीत जास्त आमदार निवडून कसे येतील हा प्रयत्न करू, असंही पाटील म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक पातळीवर आम्ही चर्चा करतो आहोत. चर्चेअंती मार्ग नक्की निघेल, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे.
प्रकाश आंबेडकर मात्र अजूनही विधानसभेला आघाडीत जाणार की स्वतंत्र चूल मांडणार, हे अस्पष्ट आहे. लोकसभेला वंचितमुळे आघाडीला 9 जागांवर फटका बसला. त्यामुळे आघाडी सावध पावलं टाकताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??
-“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”
-…अखेेर NDRF च्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्र्यांनी केलं तोंडभरुन कौतुक
-“पेशवाईची गिधाडं झडप घालण्याच्या तयारीत; आपण वेळीच त्यांना रोखू”
-“चित्रा वाघ यांनी पक्षात राहून पक्षाचं नुकसान केलं; आम्हीच हकालपट्टी करणार होतो”