31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं परत एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशात ठाकरे सरकारनं राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे.

कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या कार्यक्रमांमुळे रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला कार्यक्रमासाठी सभागृह बूक करण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याठिकाणी आसनक्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी असणार आहे.

नियोजित कार्यक्रमात सुरक्षित अंतर राखणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर मास्क आणि सानिटायझरचा वापर करणं देखील बंधनकारक असणार आहे.

60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक तसेच 10 वर्षांखालील मुलांनी घराबाहेर जाणं टाळावं, असं आवाहन देखील राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आता खबरदारीच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी या ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, 31 डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचं आवाहन केलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार

 शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य