अकोला | गेल्या दोन महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा (S.T Employ) संप कायम आहे. ऐन सणासुदीच्या मुहुर्तावर पुकारलेला हा संप मोठ्या प्रमाणावर चिघळलेला पहायला मिळाला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच अजूनही कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना. त्यामुळे सरकारनंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
सरकारनं अनेकदा अल्टिमेटम देऊनही एसटी कर्मचारी आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे प्रवाशांचे तर हाल होत आहेत आता सरकारचंही टेन्शन वाढलं आहे.
अनेकवेळा सांगून अल्टिमेटम देऊनही कर्मचारी एकत नसल्यानं आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटत नसल्याचं चित्र असतानाच अकोला आगाराची बस MH40 – 5808 वर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली.
या घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. अशा दगडफेकीमुळे मुळे कामावर परत आलेल्या चालक वाहक व प्रवाशांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे.
या दगडफेकीमध्ये ड्रायव्हर साईटची बसची काच फुटली आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.
एसटी कर्मचारी कामावर आले नाहीत तर आम्हाला कारवाई करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरणार नाही, असं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे.
दिवसेंदिवस हा संप चिघळतच चालला आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. यातच काही आगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही आगारातील कर्मचारी अजूनही संप मागे घेण्यास तयार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यात ओमिक्राॅनची तिसरी लाट येणार?; रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; सरकारकडून मिळणार खास गिफ्ट
IPL 2022: मेगा ऑक्शनपूर्वी ‘या’ 3 खेळाडूंना मिळू शकते लखनऊमध्ये डायरेक्ट एन्ट्री
CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण