Top news क्राईम देश

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात बाळाला विकलं

Photo Credit - Pixabay

नवी दिल्ली| देश कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच आणखी एक धक्कादाक घटना उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये घडल्याचं समोर येत आहे.

एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली.

आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नौजमधील तिरवा कोतवाली भागातील सतौर गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी बाळाचा जन्म झाला होता. मात्र पैशाच्या हव्यासापोटी आणि कार विकत घेण्यासाठी एका दाम्पत्याने आपल्या बाळाला गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकलं. आपलं तीन महिन्यांचं बाळ दीड लाख रुपयांना विकलं.

तसेच बाळ विकल्यानंतर आठ दिवस कोणालाही याचा पत्ताच लागू दिला नाही. मात्र नातवाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

तक्रार ऐकून सुरुवातीला पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी या प्रकरणी दाम्पत्याची चौकशी केली आणि सदर घटनेचा खुलासा झाला.

“नवजात बाळ अजूनही व्यावसायिकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणी आम्ही दाम्पत्याची चौकशी करत आहोत. या दाम्पत्याने नुकतीच एक सेकंड हँड कार खरेदी केली आहे”, असं पोलीस निरीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान एका सेकंड हँड गाडीसाठी आई-वडिलांनी नवजात बाळाला विकल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील लोकं हैराण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

चक्क कोंबडाही बोलतोय अल्लाह अल्लाह; पाहा व्हायरल होणारा…

कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून…

कौतुकास्पद! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीने केली…

चक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात…

‘कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा…