शिक्षकानं मुलीला शिकवणीसाठी बोलवलं, अन् केला अत्यंत धक्कादायक प्रकार

लखनौ | उत्तर प्रदेशमध्ये गुरुशिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षकानं आपल्याच शाळेत आठवीमध्ये शिकत असणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

प्रयागराज परिसरातील बमरौली येथे खासगी शाळेत पीडित मुलगी आठवीमध्ये शिकत होती. पीडित मुलीच्याच शाळेत शिकवणाऱ्या बृजेश नावाच्या शिक्षकानं खासगी शिकवणीच्या बहाण्यानं तिचं लैगिक शोषण केलं आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांना मुलीच्या शाळेत घडलेला हा सर्व प्रकार समजताच कुटुंबियांनी धूमनगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. धूमणगंज पोलिसांनी आरोपी बृजेशविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याला ताब्यात घेतलं आहे.

बृजेश हा मुळचा गाझीपूरचा असून गेल्या 2 वर्षांपासून तो शाळेत शिकवण्याचे काम करत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार तो शाळेतच खासगी शिकवणी घेतो. खासगी शिकवणीच्या बहाण्याने बृजेशने विद्यार्थीनीबरोबर हे अमानवी कृत्य केलं आहे. शिक्षकानेच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्यानं परिसरातील लोक संताप व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

तुझ्या शरीराचं ते अंग दाखव; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे झाली होती मागणी

पत्नीनं मारहाण केल्याचा आरोप; चक्क पोलिसानंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार