बाॅलिवूडला आणखी एक मोठा धक्का! ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनानं निधन

मुंबई| देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशातच बाॅलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे.

ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनानं निधन झालं आहे. प्रसिद्ध संगीतकाराची जोडी नदीम-श्रवण यातील संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

श्रवण यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारासाठी त्यांना माहीम येथील एल. एस. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

श्रवण यांना मधुमेहाचाही त्रास होता. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले आहे. त्यातच आता हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते.

श्रवण यांच्या निधनावर त्यांचे मित्र आणि संगीत दिग्दर्शक नदीम सैफी यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही एकत्रपणे अख्ख आयुष्य घालवलं. आम्ही आमचं यश आणि अपयश एकत्र पाहिलं आहे. आमच्यातील नातं कधीच तुटलं नाही, अशी भावना त्यांनी एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

श्रवण राठोड यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि मुलगा संजीव राठोड हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. श्रवण यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा अंत्यसंस्कारात सामील होऊ शकले नाही.

1990 साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील संगीताने नदीम-श्रवण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवून दिली. प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक या तिघांचा आवाज आणि नदीम-श्रवण यांचे संगीत हे समीकरण कमालीचे लोकप्रिय ठरले होते.

नदीम- श्रवण या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.

महत्वाच्या बातम्या – 

शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी…

कोरोना काळात वाफ कशी घ्यावी?, 5 महत्त्वाचे नियम, नाहीतर…

सेक्स एज्युकेशन विषयी माहिती देणाऱ्या ‘या’…

प्रेमाची एक गोष्ट अशीही! ‘या’ व्यक्तीनं…

चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली, चिमुकलीचा ‘हा’…