आणखी एक भाजप खासदार वादाच्या घेऱ्यात! भर समारंभात कार्यकर्त्याच्या कानशिलात वाजवली; पाहा व्हिडीओ

कोलकत्ता | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे पश्चिम बंगाल मधील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय पारा चांगलाच चढला आहे.

अशातच आता भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये होळी समारंभात सुप्रियो यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात वाजवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचं दिसताच सुप्रियो यांनी संताप व्यक्त केला आहे.

ही घटना पश्चिम बंगाल मधील टॉलीगंज येथे घडली आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रियो यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

माहितीनुसार, टॉलीगंज येथे रविवारी दुपारी 12 वाजता होळी समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बाबुल सुप्रियो देखील उपस्थित राहणार होते. मात्र, सुप्रियो यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुप्रियो अडीचच्या सुमारास पोहचले.

यामुळे एका कार्यकर्त्याने तुम्ही आधीच उशीरा आला आहात. आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहत आहेत, असं सुनावलं. यावर बाबुल सुप्रियो चांगलेच नाराज झाले होते.

यानंतर सुप्रियो यांनी काही वेळाने त्या कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यालयात बोलावले. पक्षाच्या कार्यालयात जात असताना सुप्रियो यांनी त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात वाजवली. यावेळी भाजपचे इतर कार्यकर्त्यांनी सुप्रियो यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

ही संपूर्ण घटना वृत्त माध्यमाने कॅमेऱ्यात कैद केली. मा.रहा.णीची घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सुप्रियो यांच्या लक्षात येताच त्यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला आणि बराच वेळ आपल्याकडे ठेवला.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबाद मधील लेडी पोलीस ऑफिसर बंजारा वेशभूषेत पोलीस स्टेशनसमोरच थिरकली; पाहा व्हिडीओ

अहमदनगरमध्ये गुं.डांची दह.शत! भरदिवसा दुकानामध्ये घुसून वसु.ली; पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! डाळिंब खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पुणे हा.दरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक ब.लात्कार करुन छातीत झाडली गो.ळी

‘…तर आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु’;…