मुंबई | देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँकेने कर्जदरात म्हणजेच कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने त्यात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ करून 8.60 टक्के केली आहे. पूर्वी तो दर 8.10 टक्के होता.
आरबीआयने रेपोमध्ये 50 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के वाढ करून 4.90 टक्के केली. मध्यवर्ती बँकेने या दोन महिन्यांत म्हणजेच मे आणि जूनमध्ये रेपो दरात 0.90 टक्के वाढ केली आहे.
आठवडाभरात दुसऱ्यांदा बँकेनं कर्जदर वाढवल्याने सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जे तसेच व्यावसायिक कर्जांच्या मासिक हप्त्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
बाह्य घटकांवरआधारित एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट 0.50 टक्क्यांनी वाढला असून तो 8.60 टक्के झाला असल्याचं आयसीआयसीआय बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी 5 मे 2022 रोजी एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट 0.40 टक्क्यांनी वाढवला होता.
दरम्यान, महागाई सातत्याने वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) पुरवठा समस्यांमुळे महागाई वाढली आहे. कोविड महामारीनंतर आरबीआय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले उचलत राहील, असं RBI गव्हर्नर म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “
राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे
“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची