मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वानखेडे कुटुबीयांनी नवाब मलिकांविरोधात वेगवेगळे अब्रू नुकसानीचे खटले कोर्टात दाखल केले आहेत. त्यावर सुनावणीही सुरुवात आहे. आता त्यात आणखी एका अब्रू नुकसानीच्या दावाच्या भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई हायकोर्टाने 25 नोव्हेंबरला जोरदार झटका दिला होता.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाला दिली होती.

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुलगी यास्मिनआधीच बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

प्रसारमाध्यमं, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.

दरम्यान, 31 डिसेंबरला समीरल वानखेडेंचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती समोर येते आहे. एनसीबीचे झोन डायरेक्टर असणारे समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं चर्चेत आले होते. आता ते आपल्या पदासाठी कार्यकाळ वाढवून घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

वर्षाअखेरीस त्यांचा कार्यकाळ संपत असल्याचं सांगितलं जातंय. 2008च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असलेले समीर वानखेडे 2020 साली एनसीबीच्या मुंबई शाखेचे झोनल डायरेक्टर म्हणून काम पाहू लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा 

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा 

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”