नवी दिल्ली | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद रद्द करण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) होते. ही परिषद बरखास्त करण्यात आल्याने पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय भाजप खासदार बृजभुषण सिंग (bjp mp brijbhushan singh) हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत.
बृजभुषण सिंग यांनी ही कारवाई ही केली असल्याने शरद पवार यांना धक्का दिल्याचे बोललं जात आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत.
बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन करण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रार देखील करण्यात आली होती.
या बरखास्तीनंतर नव्याने निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येतं.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी ही परिषद स्थापन केली होती. या परिषदेकडून महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते. दरम्यान मागच्या 40 वर्षांपासून या परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल
टेबलावर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं, म्हणाले…
उपमुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल!
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी
“मी अजूनही बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार”