आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….

मुंबई| महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होत आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना एकमागोमाग एक करोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. बॉलिवूड आणि साऊथची ब्यूटी क्विन अभिनेत्री पूजा हेगडे ही देखील कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. सोशल मीडियाद्वारे पूजाने ही माहिती दिलीय.

पोस्ट शेअर करत पूजानं लिहिलं की, “हॅलो, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छित आहे की माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलेली आहे. सर्व प्रोटोकॉल्सचे पालन करत मी स्वतःला आयसोलेट करून घेतलंय. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मी सर्वांना विनंती करते की जे जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, तुमचं सहकार्य आणि प्रेमाबद्दल खूप खूप आभार…मी सध्या बरी होण्यासाठी प्रयत्न करतेय, घरी रहा, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या”,

पूजा पुढे म्हणते, “तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि दिलेल्या पाठबळाबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. माझी तब्येत आता ठिक आहे. तुम्ही सर्वही घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या”.

दरम्यान ट्विटरवर #PoojaHegde ट्रेंड होत आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा फास दिवसेंदिवस अधिकाधिक आवळत चालला असताना दुसरीकडे कोरोना लसीचा देखील तुटवडा आहे. तसेच लसीकरणासाठी नागरिकांच्या रस्त्यांवर भर उन्हात लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या लाटेने राज्याला खूप मोठा फटका बसला आहे. या काळात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने अगदी आरोग्य यंत्रणेला देखील कोलमडून टाकले आहे.

pooja hegde e1619444030949

महत्वाच्या बातम्या – 

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत…

जाणून घ्या! ऑस्कर जिंकणाऱ्याला किती रुपयांचं मानधन मिळतं

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…

oscars 2021: ‘या’ चित्रपटानं 2021 सालातील तीन…

‘गावरान मुंडे’नंतर आता ‘हे’ Rap Song…