नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास, मोडला स्वत:चाच विक्रम

नवी दिल्ली | भालाफेकपटू नीरज चोप्राचा विजयाचा धडाका सुरूच आहे. एकापाठोपाठ एक अनेक विक्रम नीरज स्वत:च्या नावावर करून घेत आहे.

स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजने इतिहास रचला आहे. नीरजने 89.94 मीटरच्या सुरवातीच्याच थ्रोसह स्वत:चा विक्रम मोडला आहे.

डायमंड लीग स्पर्धेत 24 वर्षीय नीरजने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. तर नीरजचा 90 मीटरचा टप्पा केवळ 6 सेंटीमीटरने चुकला.

राष्ट्रीय विक्रमासह नीरजने या स्पर्धेतील सर्वात चांगली कामगीरी केली आहे. डायमंड लीगमध्ये नीरजने पहिल्यांदाच पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवलं आहे.

नीरजने गेल्या स्पर्धेत 89.30 मीटर भालाफेक करत विजेतेपद मिळवलं होतं. तर या डायमंड लीग स्पर्धेत 89.94 मीटर भालाफेक करत नीरजने स्वत:चाच विक्रम मोडला आहे.

दरम्यान, नीरज चोप्राने जागतिक विजेचा अँडर्सन पीटर्स नंतर दुसरं स्थान पटकावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता? कोरोना व्हायरसमागे एलियनचा हात?, किम जोंग उनच्या दाव्याने खळबळ

सर्वांचं प्रेम जर क्वचित कुणाला लाभलं असेल तर मला लाभलंय- उद्धव ठाकरे

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

‘हात जोडून विनंती आहे माझ्यावरचा राग…’, शिंदे सरकारला उद्धव ठाकरेंचं जाहीर आवाहन

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…