आणखी एक मंत्री नॉट रिचेबल; शिवसेनेचं टेंशन वाढलं

मुंबई | राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही.

उदय सामंत हे विमानाने गुवाहाटीला रवाना झाले असल्याची माहिती आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राूत हे शिवसैनिकांना आणि शिवसेना नेत्यांना एकीचं आवाहन करीत असताना पक्षातील फूट मात्र थांबण्यास तयार नाही हेच यातून दिसते आहे.

संजय राऊत हे कठोर शब्दांत बंडखोर आमदारांवर टीका करीत आहेत. मात्र तरीही शिवसेनेचे एक मंत्रीच गुवाहटीला गेल्याच्या माहितीने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानण्यात येत आहे

उदय सामंत यांच्या गुवाहाटीत जाण्याने आता शिंदेंसोबतच्या शिवसेना आमदारांची संख्या 39 होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सध्या 37 हून जास्त शिवसेना आमदार आणि 9 हून जास्त अपक्ष आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे.

उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. तसेच सध्या ते शिवसेनेकडून उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”