मुंबई | आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच वादळी ठरल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अधिवेशनात उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही पेन ड्राईव्ह बाॅम्ब फोडला होता. अशातच आज फडणवसांनी आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब फोडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडालेली पहायला मिळाली.
7 मार्च रोजीचं स्थायी समितीच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज पहा. काय लाईन लागली होती ती…. भयानक होती. आजकाल पेन ड्राईव्ह दिला तर लोकांना राग येतो, असं फडणवीस म्हणाले.
तुम्हाला हवा असेल तर तिथल्या लागलेल्या लाईनमध्ये कोण-कोण होतं, कोण आत जात होतं कोण बाहेर येत होतं याचा पेन ड्राईव्ह द्यायला मी तयार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे जेव्हा धाड पडली. पहिल्यांदा 130 कोटी आणि नंतर ती वाढता वाढता 300 कोटींची बेहिशोबी संपत्ती सापडली. दोन वर्षांत 38 संपत्ती त्यांनी जमवल्याचा पूर्ण रेकॉर्ड सापडला आहे.
इथं लोक कोरोनामुळे मरत होते आणि तिकडे संपत्ती खरेदी सुरू होती. प्रॉपर्टी खरेदीचा रेटही पाहा 24 महिन्यात 38 प्रॉपर्टीची खरेदी. दादांचीही एवढी जमीन नसेल. बारामती पासून ते मुंबईतील संपत्तीपर्यंतच्या संपत्तीची माहिती मी तुम्हाला देतो, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आता फडणवीसांच्या आरोपांनी आणि गौप्यस्फोटांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. आता यावर काय प्रतिसाद उमटतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!